Friday, 24 February 2017

अजित पवार झाले ‘कारभारी’





पुणे /प्रतिनिधी : गेली दहा वर्षे पुण्याचे कारभारीपद भूषविलेल्या अजित पवार यांना पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निकालांनी चांगलाच धक्का दिला आहे. पवार यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये राज्य सरकार तसेच पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यामध्ये सत्ता नसल्याची वेळ त्यांच्यावर पहिल्यांदाच आली असून आता फक्त पुणे जिल्हा परिषदेचे कारभारीपद त्यांच्याकडे राहिले आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे राजकीय वारसदार म्हणून अजित पवार यांच्याकडे पाहिले जाते. नव्वदच्या दशकामध्ये पवार यांनी जिल्हा बॅँकेच्या संचालकपदापासून आपल्या राजकारणाची सुरूवात केली. त्यानंतर लगेचच पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅँकेचे अध्यक्षपद त्यांच्याकडे आले. जिल्हा बॅँकेचे अध्यक्षपद भूषविणारे ते सर्वांत तरुण नेते होते. त्यानंतर पवार यांनी मागे वळून पाहिले नाही. सन १९९१च्या निवडणुकीमध्ये त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवून बारामतीमधून विजय मिळविला होता. मात्र त्यानंतर शरद पवार यांनी दिल्लीच्या राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला आणि अजित पवार हे राज्याच्या राजकारणामध्ये रमले. पहिल्यापासून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये त्यांनी रस घेतला होता. त्यांच्या समवयस्क नेत्यांसोबत त्यांनी त्या वेळेस पिंपरी चिंचवड पालिकेची सूत्रे असलेल्या प्रा. रामकृष्ण मोरे यांना शह देऊन स्वतःचा भक्कम गट तयार केला होता. त्या वेळेपासून आजपर्यंत पिंपरी चिंचवड वरील त्यांची सत्ता कायम राहिली.

सन १९९४मध्ये राज्यात शिवसेना व भाजपचे सरकार आले तेव्हा अजित पवार यांना विरोधी बाकावर बसावे लागले. पण तो त्यांच्या उमेदीचा काळ होता. त्याचवेळेस पुण्याची जिल्हा परिषद आणि जिल्हा बॅँक तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सत्तासूत्रेही त्यांच्याकडे आली होती. शरद पवार यांच्याकडेही कोणी गेले तर स्थानिक कामासाठी ते अजित पवारांना भेटा असे सांगण्याची ती वेळ होती. त्यानंतर १९९८मध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसची स्थापना झाल्यानंतर अजित पवार यांना संघटनेमध्येही महत्त्व मिळाले. त्याचा उपयोग त्यांनी राज्यातील आपला संपर्क वाढविण्यासाठी केला. हळुहळू त्यांचा प्रभाव वाढला व पिंपरी-चिंचवड पाठोपाठ पुणे महापालिकेमध्येही त्यांनी तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी यांना आव्हान देण्यास सुरुवात केली होती. सन २००७च्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांनी ‘कलमाडी यांना हटवून पुण्याचा कारभारी बदला’ अशी हाक जाहीर प्रचारात दिली आणि पुण्याने कारभारीपद अजित पवार यांच्याकडे सोपविले. त्यानंतर कॉँग्रेसला बरोबर घ्यायचे नाही, या हट्टापोटी त्यांनी शिवसेना-भाजपसोबत आघाडी करून पुणे पॅटर्न राबवित आपली सत्ता कायम राखली. त्यानंतर पुन्हा कॉँग्रेसला बरोबर घेऊन त्यांनी महापालिकेमध्ये सत्ता मिळविली होती.

Thursday, 16 February 2017

'शिवसेनेचा व्हिजनऐवजी टक्केवारीत इंट्रेस्ट'

विकासाचा अजेंडा राबवण्याचे काम नागपूर महापालिकेने केले. पण, महापौर आणि स्थायी समिती असूनही मुंबई महापालिकेत पाणी, रस्ते, घनकचरा व्यवस्थापनाबाबत काहीही घडलेले नाही. शिवसेनेला व्हिजन या गोष्टीशी काहीही देणेघेणे नसून त्यांना केवळ टक्केवारी हवी आहे. या टक्केवारीनेच मुंबईचा घात केल्याचा घणाघाती आरोप केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी विलेपार्ले येथील सभेत केला. शिवसेनेस लक्ष्य करताना दर्जेदार रस्ते आणि विकासाची कामे झाली की अधिकारी, नगरसेवक आणि नेते नाराज होत असल्याचा गौप्यस्फोट करत गेल्या २० वर्षांत सेनेने अशी कोणती कामे केली की मुंबईकरांना ती आपलीशी वाटेल, असाही टोलाही त्यांनी लगावला.

शिवसेनेने प्रादेशिक पक्षांबरोबर युती करू असे जाहीर केले आहे, त्याचाही समाचार गडकरी यांनी या सभेत घेतला. तुम्ही मायावती, मुलायमसिंह, ममता बॅनर्जी यांच्या बरोबर जाणार का आणि ते तुम्हाला घेतील का, असा मुद्दा त्यांनी मांडला. युती ही दोन पक्षांची मजबुरी असून दोघांनाही एकमेकांची गरज असते. आमची युती नसती तर तुमचा मुख्यमंत्री झाला असता का, असा सवाल त्यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील आरोपांत काहीही तथ्य नसून मी दिलेल्या त्रासाच्या रागापोटी तेव्हाचे मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी नागपूर महापालिकेची चौकशी लावली होती. त्यात देवेंद्र फडणवीस यांचे नाव त्यांनी गुंतवले. पण, देवेंद्र फडणवीस क्लीन असल्याचेही त्यांनी नमूद केले.

युवा नेते संतोष काळे व बाळासाहेब घुटुकडे शिवसेनेत दाखल

यावेळी मा.तानाजी पाटील व मा.भारत तात्या पाटील उपस्थित होते.

लेंगरेवाडीमध्ये शिवसेनेला खिंडार शेकडो कार्येकर्ते भाजपा मध्ये दाखल.

यावेळी महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ मा.गोपीचंद पडळकर साहेब, मा.हर्षवर्धन देशमुख, तालुकाअध्यक्ष मा.प्रभाकर पुजारी, शहरअध्यक्ष ऋषिकेश पाटील, मा.अनिल सुर्यवंशी, मा.दिगंबर मरगळे मा .तानाजी कोळेकर इ. मान्यवर उपस्थित होते.

Wednesday, 15 February 2017

जिल्हा परिषद प्राथ.शाळा साळसिंगमळा (दिघंची) येथे छात्रशिक्षक सेवाकालास प्रारंभ

आटपाडी वार्ताहार :- दि.आटपाडी एज्युकेशन सोसायटी आटपाडी चे अध्यापक विद्यालय आटपाडी, यांच्या द्वितीय वर्षाच्या छात्रशिक्षक सेवाकाल शिबिराची (पाक्षिक) सुरवात जि.प.प्राथ.शाळा साळसिंगमळा (दिघंची ) येथे करण्यात आली.या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यास अध्यक्ष म्हणून मा.श्री.एम.जे.ढोले सर ,प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री.अमोल पुसावळे हे लाभले होते.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती चे सदस्य तथा शाळेचे मुख्याधापक श्री.संतोष पिसे ,सहशिक्षक श्री.पोपट बेंढारी, अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य मा.श्री.मगर सर,पाक्षिक विभागाच्या प्रमुख सौ.घोंगडे ‘°S>‘ व इतर सहकारी उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे ढोले सर म्हणाले की,बदलत्या काळाप्रमाणे शिक्षण व्यवस्था बदलत आहे,बदलत्या काळाप्रमाणे छात्र शिक्षकांनी आपल्या अंगी बदल स्वीकारून शिक्षण क्षेत्रात कार्य करण्यास सिद्ध झाले पाहिजे.”घोका आणी ओका” ही पूर्वीची संकल्पना मागे पडून, आता ज्ञानरचनावादी अध्यापन करणे ही काळाची गरज आहे.बदलती मूल्यमापन पद्धती ,या प्रमाणे अध्यापन व मूल्यमापन करणे गरजेचे आहे एकुणच विद्यार्थांचा सर्वांगीण विकास झाला तरच ,आजचा विद्यार्थी उद्याच्या जगात ताठ मानेने जगायला शिकेल.हे शिबीर दि.१३/०२/२०१७ ते २२/०२/२०१७ अखेर चालणार आहे,या कार्यक्रमाचे संयोजन अध्यापक विद्यालयाच्या द्वितीय वर्षाच्या छात्रशिक्षिका यांनी केले होते.

Tuesday, 14 February 2017

अमिताभ बच्चन तुरुंगात जातील: अमर सिंह


नवी दिल्ली: पुन्हा एकदा समाजवादी पार्टीतून हकालपट्टी करण्यात आलेले अमर सिंह यांनी वादग्रस्त वक्तव्य केले असून राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेकांच्या भुवया त्यांच्या या वक्तव्यामुळे उंचावल्या आहेत. त्यांनी नुकतीच एबीपी न्यूजला मुलाखत दिली असून त्यात त्यांनी अमिताभ बच्चन हे तुरूंगात जातील, असा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.
अमर सिंह यांनी या मुलाखतीत डिम्पल यादव आणि जया बच्चन यांच्या संदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, प्रियंका गांधींपेक्षा जया बच्चन डिम्पल यादव यांना चांगल्या वाटतात. कारण पनामा पेपरमध्ये त्यांचेही नाव आहे. यातील सरोज जयवाला यांना न्यायालयाने नोटीस बजावली, तर पनामा पेपर प्रकरणाची पूर्ण माहिती समोर येईल आणि यानंतर अमिताभ बच्चन तुरुंगात जातील. अमर सिंह यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यापासून ते असेच वादग्रस्त वक्तव्य करत फिरत आहेत. याआधीही अमर सिंह यांनी अमिताभ बच्चन यांच्या बाबतीत खळबळजनक दावा केला होता. जया बच्चन आणि अमिताभ बच्चन हे वेगवेगळे राहात असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला होता.