आटपाडी वार्ताहार :-
दि.आटपाडी एज्युकेशन सोसायटी आटपाडी चे अध्यापक विद्यालय आटपाडी, यांच्या द्वितीय वर्षाच्या छात्रशिक्षक सेवाकाल शिबिराची (पाक्षिक) सुरवात जि.प.प्राथ.शाळा
साळसिंगमळा (दिघंची ) येथे करण्यात आली.या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यास अध्यक्ष
म्हणून मा.श्री.एम.जे.ढोले सर ,प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष
श्री.अमोल पुसावळे हे लाभले होते.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती चे सदस्य तथा शाळेचे
मुख्याधापक श्री.संतोष पिसे ,सहशिक्षक श्री.पोपट बेंढारी, अध्यापक विद्यालयाचे
प्राचार्य मा.श्री.मगर सर,पाक्षिक विभागाच्या प्रमुख सौ.घोंगडे ‘°S>‘ व इतर सहकारी उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे ढोले सर
म्हणाले की,बदलत्या काळाप्रमाणे शिक्षण व्यवस्था बदलत आहे,बदलत्या काळाप्रमाणे
छात्र शिक्षकांनी आपल्या अंगी बदल स्वीकारून शिक्षण क्षेत्रात कार्य करण्यास सिद्ध
झाले पाहिजे.”घोका आणी ओका” ही पूर्वीची संकल्पना मागे पडून, आता ज्ञानरचनावादी
अध्यापन करणे ही काळाची गरज आहे.बदलती मूल्यमापन पद्धती ,या प्रमाणे अध्यापन व
मूल्यमापन करणे गरजेचे आहे एकुणच विद्यार्थांचा सर्वांगीण विकास झाला तरच ,आजचा
विद्यार्थी उद्याच्या जगात ताठ मानेने जगायला शिकेल.हे शिबीर दि.१३/०२/२०१७ ते
२२/०२/२०१७ अखेर चालणार आहे,या कार्यक्रमाचे संयोजन अध्यापक विद्यालयाच्या द्वितीय
वर्षाच्या छात्रशिक्षिका यांनी केले होते.

No comments:
Post a Comment