
नवी दिल्ली: पुन्हा एकदा समाजवादी पार्टीतून हकालपट्टी करण्यात आलेले अमर सिंह यांनी वादग्रस्त वक्तव्य केले असून राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेकांच्या भुवया त्यांच्या या वक्तव्यामुळे उंचावल्या आहेत. त्यांनी नुकतीच एबीपी न्यूजला मुलाखत दिली असून त्यात त्यांनी अमिताभ बच्चन हे तुरूंगात जातील, असा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.
अमर सिंह यांनी या मुलाखतीत डिम्पल यादव आणि जया बच्चन यांच्या संदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, प्रियंका गांधींपेक्षा जया बच्चन डिम्पल यादव यांना चांगल्या वाटतात. कारण पनामा पेपरमध्ये त्यांचेही नाव आहे. यातील सरोज जयवाला यांना न्यायालयाने नोटीस बजावली, तर पनामा पेपर प्रकरणाची पूर्ण माहिती समोर येईल आणि यानंतर अमिताभ बच्चन तुरुंगात जातील. अमर सिंह यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यापासून ते असेच वादग्रस्त वक्तव्य करत फिरत आहेत. याआधीही अमर सिंह यांनी अमिताभ बच्चन यांच्या बाबतीत खळबळजनक दावा केला होता. जया बच्चन आणि अमिताभ बच्चन हे वेगवेगळे राहात असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला होता.
No comments:
Post a Comment